ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसेच्या भगवीकरणामागे शरद पवारांचे डोकं आहे असा आरोप भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी केले आहे. मनसेच्या बदलेल्या झेंडय़ामागे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले, यामागे शरद पवार यांनीच हे षडयंत्र आखलं आहे. सत्तेसाठी शिवसेनेने हिरवेपणा स्विकारल्यामुळे हिंदू मताचा फायदा भाजपाला होईल. हा फायदा भाजपाला होऊ नये म्हणून शरद पवार यांनी ही राजकीय खेळी केली आहे.