ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसेच्या मुंबईतील महाअधिवेशनात अमित ठाकरेंचं लाँचिंग करण्यात आले. मनसेच्या नेतेपदी अमित ठाकरे यांची निवड करण्यात आली. नेतेपदी निवड झाल्यानंतर अमित ठाकरे यांना शाल आणि तलावर देऊन सत्कार करण्यात आला.
तसंच पहिल्याच कार्यक्रमात त्यांनी शिक्षण ठरावही मांडला आहे. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होणं गरजेचं आहे असं ते ठरावात म्हणाले. ठराव मांडण्यापूर्वी अमित ठाकरे यांनी वडील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले.
ते म्हणाले, राज ठाकरे यांनी काल संध्याकाळी मला आज ठराव मांडला जाणार असल्याची माहिती दिल्याने पायाखालची जमीन सरकली होती. याआधी जे प्रेम, प्रतिसाद दिला आहे तो यापुढेही द्याल अशी अपेक्षा यावेळी त्यांनी मनसे कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली.









