प्रतिनिधी / बेळगाव
कचऱयाची उचल करताना डिझेलवर चालणाऱया वाहनांमुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी ई-ऑटोटिप्पर खरेदी करण्याचा विचार महानगरपालिकेने चालविला आहे. या ई-ऍटो टिप्परचे प्रात्यक्षिक महापालिका आयुक्त जगदीश के.एच. यांनी शुक्रवारी केले. प्रदुषण नियंत्रणासह इंधनाकरिता होणारा खर्च वाचविण्यासाठी ई-ऍटोटिप्परचा प्रस्ताव चांगला असल्याने प्रायोगिक तत्वावर दोन टिप्पर खरेदी करण्यास आयुक्तांनी हिरवा कंदील दर्शविला आहे.
शहर आणि उपनगरात घरोघरी जाऊन कचऱयाची उचल केली जाते. याकरिता महानगरपालिकेने वाहने खरेदी केली आहेत. तर काही ठिकाणी भाडेतत्वावरील वाहनांची नियुक्ती करण्यात आली आहे. कचरा घेण्यासाठी वाहन शहरात फिरत असल्याने प्रदुषण होत असते. त्याचप्रमाणे इंधनाकरिता मोठय़ाप्रमाणात खर्च होत आहे. परिणामी महापालिकेच्या खजिन्यावर अर्थिक भुर्दंड वाढला आहे. तसेच कचऱयाची उचल करण्याकरिता ई-टिप्परचा वापर करण्याची सुचना प्रशासनाने केली आहे. त्यामुळे घरोघरी जावून कचरा जमा करण्यासाठी ई-टिप्पर खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या महापालिकेच्या ताफ्यात कचरा वाहतुक करणारी वाहने डिझेलवर चालणारी आहेत. डिझेलवर चालणाऱया वाहनांमुळे प्रदुषणाचे प्रमाण वाढते. कचरा उचल करण्यासाठी घरोघरी जाणारी वाहने थांबत जात असतात त्यामुळे डिझेल वाहनांचे प्रदुषण वाढते. त्यामुळे प्रदुषण रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाय योजना राबविण्याची सूचना महापालिका आयुक्तांनी केल्या आहेत. त्याकरीता विजेवर चालणारी वाहने खरेदी करण्याची सूचना महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी केली आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर विजेवर चालणारे ई-ऑटो टीप्पर खरेदी करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 2 ई-ऑटोटिप्पर खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. याकरिता ई-ऍटोटिप्परचे प्रात्यक्षिक महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी केले. शहरातील रस्त्यांना चढ-उत्तार असल्याने सर्व ठिकाणी व्यवस्थित चालण्यासाठी ई-ऍटोटिप्परचे प्रात्यक्षिक हनुमान नगर येथे करण्यात आले. ई-ऍटोटिप्परच्या कंपनीच्या अधिकाऱयांकडून सर्व माहिती जाणून घेतली. 1हजार व्हॅटची बॅटरीवर चालणाऱया ऍटोटिप्परची किमत्त दोन लाखापर्यत आहे. सदर बॅटरी चार तास चार्जिंग केल्यास सदर 80 किलोमीटर धावू शकते. एका बॅटरी चार्ज करण्याकरिता 5 रूपये खर्च अपेक्षित आहे. सदर वाहन चालविण्याकरिता चालकांला वाहन परवान्याची आवश्यकता नाही. तसेच रोड टॅक्स भरण्याची गरज नाही. ई-ऍटोटिप्परमधून 400 किलो वजन वाहून नेता येवू शकते अशी माहिती कंपनीच्या प्रतिनिधीनी दिली.
ई-ऍटोटिप्परमुळे इंधनाकरिता करण्यात येणाऱया खर्चाची बचत होणार असून इंधन घालताना होणारे गैरप्रकार टाळण्याची शक्मयता आहे. रोडटॅक्स भरावा लागणार नाही. तसेच किंमत देखील कमी असून भारतीय बनावटीची असल्याने दुरूस्तीचे काम तातडीने करता येवू शकते. प्रदुषण देखील होणार नाही. यामुळे कचरा जमा करण्यासाठी ई-ऍटोटिप्पर खरेदी करण्यास आयुक्तांनी हिरवा कंदील दर्शविला असून याकरिता लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









