प्रतिनिधी/ बेळगाव
रामतीर्थनगरमधून टाटा-एस वाहनातून महापालिकेसमोर कचरा आणून टाकणाऱयांकडून महापालिकेने दंड वसूल केला आहे. याचबरोबर यापुढे अशा प्रकारे आम्ही कधीही कचरा टाकणार नाही, अशी हमी त्यांनी दिली. कचरा टाकल्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱयांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.
रामतीर्थनगर बुडाकडे येते. अजून महानगरपालिकेकडे रामतीर्थनगरचे हस्तांतर झाले नाही. मात्र, या घटनेमुळे महापालिकेची बदनामी झाली म्हणून महापालिकेच्या नोकर संघटनेने जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले होते. निवेदन देण्यापूर्वी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. मात्र, पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याने हे निवेदन दिल्याचे सांगण्यात आले होते.
या घटनेनंतर ज्यांनी कचरा टाकला त्या सर्वांनी महापालिकेमध्ये जाऊन रितसर दंड भरला. त्याचबरोबर यापुढे अशा प्रकारचे कृत्य आम्ही करणार नाही, असेही कचरा टाकलेल्या तरुणांनी सांगितले.









