प्रतिनिधी / बेळगाव
महापालिका प्रशासकपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी सोमवार दि.20 रोजी दुपारी 3 वाजता महापालिकेला भेट देणार आहेत. यावेळी अधिकाऱयांच्या ओळख परेडसह कारभाराची माहिती घेणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
महापालिकेचे लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात नसल्याने प्रशासकीय राजवट आहे. प्रशासकपदाचा कार्यभार जिल्हाधिकाऱयांकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी महापालिकेत बैठक घेऊन कारभार हाताळला होता. मात्र, सध्या जिल्हाधिकारीपदी एम. जी. हिरेमठ यांची नियुक्ती करण्यात आल्याने सोमवारी महापालिका कार्यालयाला भेट देणार आहेत. भेटीवेळी महापालिका कार्यालयातील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन कामकाजाची माहिती घेणार असल्याचे समजते.









