प्रतिनिधी / पणजी
पणजी महापालिकेने सोमवारी मार्केटमधील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई केली असून संबधित विक्रेत्यांचे सामान जप्त करण्यात आले आहे. मनपा आयुक्त संजित रॉड्रिक्स यांनी स्वतः उपस्थित राहून आपल्या देखरेखीखाली ही कारवाई केली. या कारवाईमुळे अनेक विक्रेत्यांना नुकसानीस सामोरे जावे लागले. अनेक विक्रेत्यांनी त्यांना मार्केटमध्ये ठरवून दिलेल्या जागेच्या आसपास अतिक्रमण केले होते., जादा फळ्या मारून अतिरिक्त जागेत पसारा वाढवला होता. त्यांच्या तक्रारी मनपाकडे आल्यानंतर आयुक्त रॉड्रिक्स यांनी दखल घेऊन कारवाईची मोहीम राबविली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे विक्रेत्यांचे धाबे दणाणले व धावपळ उडाली. दरम्यान, महापौर उदय मडकईकर मात्र कारवाईच्यावेळी उपस्थित नव्हते.









