महालक्ष्मी लवकरच सुरू होणार, पॅसेंजर गाड्यांबद्दल मौन
प्रतिनिधी/मिरज
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी मिरज जंक्शनला आज, शुक्रवारी धावती भेट दिली. यावेळी त्यांनी विविध विभागांची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही दिली. मात्र, प्रवाशांचा आग्रह असलेल्या मिरज-कोल्हापूर, मिरज-पुणे, मिरज-बेळगाव, मिरज-पंढरपूर या पॅसेंजर गड्यांबाबत त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश खाडे यांनी प्रवाशांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन दिले.
महाव्यवस्थापकांचा दौरा होणार असल्याने मिरज जंक्शनवरील सर्व प्लॅटफॉर्म आणि स्थानक परिसर चकाचक करण्यात आला होता. एरवी कचरा कोंडाळ्यात असलेल्या जंक्शनवर आज मात्र एका लग्न सभामंडपा सारखे सजविण्यात आले होते. सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी जीएम स्पेशल ट्रेनने महाव्यवस्थापक संजीव मित्तल मिरज जंक्शनवर दाखल झाले. त्यांच्या सोबत पुणे विभागीय रेल प्रबंधक रेणू शर्मा होत्या. प्रारंभी त्यांनी विविध विभागांची पाहणी केली.
पत्रकारांना प्रवेश बंदी, अधिकाऱ्यांकडूनच सोशल डिस्टन्सचा भंग
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळण्याचे कारण सांगून पत्रकारांना स्थानकात प्रवेश बंदी होती. सुमारे पाऊण तास महाव्यवस्थापक आणि संबंधित विभागांचे शंभरहून अधिक अधिकारी विविध विभागांची पाहणी करताना दिसत होते. रेल्वे फोर्सचे पोलीस कर्मचारी स्थानकाच्या प्रवेश द्वाराजवळच पत्रकार आणि निवेदन देण्यासाठी आलेल्या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांची अडवणूक करीत होते. अखेर वाद झाल्यानंतर पाहणी दौऱ्याच्या उत्तरार्धात प्रवेश सर्वांना प्रवेश देण्यात आला.
रेल्वे विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गर्दीने स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 वर जत्रेचे स्वरूप आले होते. पत्रकारांना कोरोनाचे नियम सांगणाऱ्या अधिकाऱ्यांनी सोशल डिस्टनचा भंग केल्याचे दिसत होते. मात्र, रेल्वे महाव्यवस्थापकानी प्रसार माध्यमांशी बोलणे टाळले. केवळ खासदार संजय पाटील आणि आमदार सुरेश खाडे यांच्याशी दोन मिनिटं चर्चा करून महालक्ष्मी एक्स्प्रेस लवकरच सुरू करु, अशी ग्वाही दिली. मात्र, प्रवाशांचा आग्रह असणाऱ्या पॅसेंजर गड्यांबद्दल त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








