पॅसेंजर गाड्या सुरू करण्यासाठी रेल्वे संघटनांचे साकडे, विविध विषयांवर चर्चा
प्रतिनिधी/मिरज
मिरज ते पुणे रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांनी गुरूवारी सकाळी मिरज जंक्शनला भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत पुणे विभागाचे मंडल रेल प्रबंधक श्रीमती रेणु शर्मा उपस्थित होत्या. यावेळी कोल्हापुर, बेळगांव, सातारा व पंढरपूर पॅसेंजर रेल्वे तातडीने सुरु करा, अशी मागणी रेल्वे कृति समितीने केली.
कोल्हापूर, मिरज, सांगली, पंढरपूर, बेळगांव याभागामधे शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी आस्थापनेमधे नोकरी करणाऱ्याची संख्या मोठी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे पॅसेंजर रेल्वे गाड्या बंदच आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांची गैरसोय होत असून, रेल्वे प्रशासनाने कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्याच्या अटीवर पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात, अशी मुख्य मागणी कृती समितीने यावेळी केली.
मुख्य प्रबंधक यांनी रेल्वे प्रशासनाची पॅसेंजर सेवा पूर्ववत करण्याची तयारी आहे. तसेच रेल्वे मंत्रालयाचीही मान्यता आहे. परंतू राज्य शासनाकडून याबाबत मान्यता मिळाली नसल्याने पॅसेंजर सेवा सुरू करता येत नसल्याचे सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








