ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्यप्रदेश मधील काँग्रेसचे नेते आणि आमदार पी. सी. शर्मा यांचे कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः शर्मा यांनी शनिवारी ट्विट करत ही माहिती दिली.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, माझे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मी रुग्णालयात दाखल झालो आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपली चाचणी करुन घ्यावी, धन्यवाद. पुढे ते म्हणाले, सध्या माझी प्रकृती स्थिर आहे. माझ्यावर चिरायू रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, शर्मा हे मध्य प्रदेशातील भोपाळ दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील 14 व्या विधानसभेचे सदस्य आहेत. मुख्यमंत्री चौहान यांनी काँग्रेस नेते शर्मा यांना ट्विटरवरून लवकरात लवकर ठीक होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.