- जबलपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग
ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्य प्रदेशात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने इंदौर आणि भोपाळमध्ये बुधवारी रात्रीपासून (दि. 17) नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहे. यासोबत सामूहिक होळीच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने ज्या 10 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक आहे त्या जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध घातले आहेत. त्यातच जबलपूरचे जिल्हाधिकारी कर्मवीर शर्मा यांनी कोविडची पहिली लस घेतली असून देखील सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
दरम्यान, प्रदेश सरकारने जबलपूर, ग्वालियर, उज्जैन, रतलाम, बुरहानपुर, छिंदवाडा, बैतूल आणि खरगौनमधील बाजारपेठांवरील निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. त्या अंतर्गत आता रात्री 10 वाजल्यानंतर सर्व बाजारपेठा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.









