गांधीनगरनजीक पाच जणांना अटक, 14 हजार रुपये जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
बुधवारी मध्यरात्री गांधीनगरजवळील मुचंडी गॅरेजनजीक एका जुगारी अड्डय़ावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत पाच जुगाऱयांना अटक करण्यात आली असून त्यांच्याजवळून 14 हजार 650 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. मुचंडी गॅरेजजवळ अंदर-बाहर जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच मध्यरात्री 1.40 वाजण्याच्या सुमारास माळमारुती पोलिसांनी अचानक छापा टाकला. या कारवाईत पाच जुगाऱयांना अटक करण्यात आली. सर्व पाच जणांवर कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली आहे. मागील दोन दिवसांपासून पोलिसांनी मटका व जुगारी अड्डय़ांवरील कारवाई तीव्र केली आहे. खडेबाजार, मार्केट, उद्यमबाग पोलिसांनी बुधवारी मटका अड्डय़ांवर छापे टाकले होते. तर माळमारुती पोलिसांनी पाच जुगाऱयांना अटक केली आहे.









