ऑनलाईन टीम / भोपाळ :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत मध्य प्रदेशात 28 डिसेंबर म्हणजेच आज पासून सुरू होणारे तीन दिवसीय हिवाळी अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे.
मध्यप्रदेशातील विधानसभेचे प्रमोट स्पीकर रामेश्वर शर्मा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, विधानसभेतील 61 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हिवाळी अधिवेशन स्थगित करण्याचा निर्णय आज झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत घेण्यात आला आहे.
पुढे ते म्हणाले, आता थेट अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल. या बैठकीला मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, कमलनाथ, निरोत्तम मिश्रा यांच्यासह अन्य आमदार उपस्थित होते.









