72 लाखाचे 1500 बॉक्स जप्त
बांदा / प्रतिनिधी-
गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई सत्र सुरूच ठेवले आहे. गोव्याहून मध्यप्रदेश येथे गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या ट्रक वर कारवाई करत तब्बल 72 लाखाचे 1500 बॉक्स जप्त केले तर 8 लाख किमतीचा ट्रक असा एकूण 80 लाख रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेत सर्वात मोठी कारवाई केली. हि कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या इन्सुली तपासणी नाका येथे पहाटे 3 च्या सुमारास केली. या प्रकरणी मध्यप्रदेश मधील चारजणांना ताब्यात घेतले. राज्याच्या ठीकठिकाणी अलीकडे गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्यावर कारवाई केली.त्यानंतर जिल्ह्यात करण्यात आलेली हि सगळ्यात मोठी कारवाई आहे.









