ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये कोरोना कर्फ्यू 31 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. काल मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत झालेल्या क्रायसिस मॅनेमेंट टीमच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

शिवराज चौहान म्हणाले, यापूर्वी 24 मे पर्यंत प्रदेशात कडक निर्बंध लादण्यात आले होते. भोपाळ, विदिशा, राजगड, सिरोह आणि रायसेनमध्ये 10 दिवस कडक कोरोना कर्फ्यू असून याचे पालन करणे बंधनकारक आहे. सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
- इंदौरच्या पॉझिटिव्ह रेटमध्ये घट
इंदौरमध्ये कोरोना रुग्ण संख्येत लक्षणीय सुधारणा होताना दिसत आहे. पॉझिटिव्ह रेट 9 % इतका आहे. तसेच प्रशासनाच्या मते प्रदेशात अशा प्रकारे सुधारणा झाली तर 1 जूनपासून हळूहळू शहर सुरू केले जाणार आहे.
एप्रिलमध्ये संसर्गाचा दर 22 टक्के वर पोहचला होता. मात्र, आता परिस्थिती सुधारत आहे. प्रदेशातील अनेक रुग्णालये सध्या खाली आहेत आणि काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.









