ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्यप्रदेशातील बाकोडा येथे लालबुरा पोलिसांनी गोतस्करी रॅकेटचा पर्दाफाश करत 165 गाई-बैलांची सुटका केली. याप्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली असून, रॅकेटचा मुख्य आरोपी हा भाजप युवा मोर्चाचा सचिव असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशच्या बाकोडा गावातून 165 गाई आणि बैलांची तस्करी केली जात होती. नागपुरात या गाई-बैलांची कत्तल करण्यात येणार होती. याची माहिती पोलिसांना मिळताच लालबुरा पोलीस ठाण्याचे गस्ती पथक बाकोडा येथे पोहचले. त्यावेळी गाईंची वाहतूक करणाऱ्या मद्यधुंद चालकांसह 10 जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणात 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.









