ऑनलाईन टीम / भोपाळ :
गाय संरक्षणासाठी मध्यप्रदेश सरकार ‘गो कॅबिनेट’ची स्थापना करणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज गौ अभयारण्य सालरिया आग्रा मालवा येथे पहिली बैठक पार पडली.
गाय संरक्षण आणि संवर्धनासाठी अर्थ, गृह आणि शेतकरी कल्याण विभागांचे मंत्री आणि प्रधान सचिव एकत्र काम करतील, केवळ पशुसंवर्धन विभागाकडून त्यावर नियंत्रण ठेवता येणार नाही. राज्यातील गायींच्या संरक्षणासाठी शिवराज सिंह सरकारने एक मंत्रिमंडळ स्थापन केले आहे. तसेच यासाठी अतिरिक्त निधी उभारण्यासाठी ‘गो-सेवा सेस’ लागू करण्याचा विचार सरकार करत आहे.
गो रक्षणासाठी सरकारी पैसा खर्च करण्यापेक्षा उपकरामुळे गोरक्षणाच्या कामात लोकांचा सहभाग सुनिश्चित होईल. राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील अनेक उत्पादनांवर असा उपकर आकारला जातो.गो कॅबिनेटमध्ये पशुपालन, वन, पंचायत आणि ग्रामीण विकास, अर्थ, गृह आणि शेतकरी कल्याण विभागाचाही सहभाग असणार आहे.









