ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्यप्रदेश सरकार मंगळवारपासून ‘धार्मिक स्वातंत्र्य विधेयक 2020’ ची अंमलबजावणी करणार आहे. या विधेयकात विवाहासाठी किंवा इतर कोणत्याही फसव्या पद्धतीने धर्मांतर झाल्यास जास्तीत जास्त 10 वर्षे कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ही माहिती दिली.
या विधेयकावर मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, राज्यात धार्मिक स्वातंत्र्य विधेयकाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर लग्नासाठी एखाद्या व्यक्तीला आमिष दाखवणे, धमकावणे आणि जबरदस्तीने विवाह किंवा इतर फसव्या पद्धतीने आपला धर्म बदलण्याचा कोणीही प्रयत्न करू शकणार नाही.