ऑनलाईन टीम / राजगढ :
मध्यप्रदेशातील काँग्रेसचे आमदार गोवर्धनसिंह दांगी यांचे निधन झाले. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.
कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर दांगी यांना मेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्यामुळे ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. सोमवारी रात्री त्यांची प्रकृती खालावली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
दांगी हे राजगढ जिल्ह्यातील ब्यावरा मतदारसंघाचे आमदार होते. दांगी यांचे पुत्र लक्ष्मणसिंह दांगी त्यांचे पार्थिव घेऊन ब्यावरा येथे येत आहेत. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दांगी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.









