ऑनलाईन टीम / चेन्नई :
मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए. पी. साही यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्यांना राजीव गांधी सरकारी जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या साही यांची प्रकृती स्थिर आहे. साही यांना गुरुवारी खोकला येत होता तसेच त्यांना अस्वस्थ देखील वाटत असल्याने त्यांचा स्वैब घेण्यात आला. त्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले.