लॉकडाऊनसह अधिकच्या कराचा परिणाम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू आर्थिक वर्षात 2020-21 मधील पहिल्या सहामाहीत भारतामध्ये निर्मिती होणाऱया विदेशी मद्याची विक्री (आयएमएफएल) जवळपास 29 टक्क्मयांनी घसरली आहे. कॉन्फडरेशन ऑफ इंडियन अल्कोहलिक बेवरेजेस कंपनीच्या (सीआयएबीसी) ताज्या आकडेवारीनुसार ही माहिती दिलेली आहे.
सीआयएबीसी पुढे घसरणीचे स्पष्टीकरण देताना म्हटले आहे, की देशात पुकारण्यात आलेले लॉकडाऊन आणि अधिकची कर आकारणी यामुळे ही विक्री मोठय़ा प्रमाणात घसरली आहे.
आंध्रप्रदेशमध्ये मद्य विक्रीत जवळपास 50 टक्क्मयांची घसरण राहिली आहे. यासोबत पश्चिम बंगाल, पुदुचेरी आणि राजस्थानातही मोठी घसरण नोंदवली आहे. विक्रीवर जवळपास 50 टक्क्मयांपेक्षा जास्त कर आकारणी केल्याने हा प्रभाव राहिला आहे.









