सुदैवाने जीवितहानी टळली, ट्रकचे नुकसान
प्रतिनिधी /बेळगाव
मद्य वाहतूक करणारा ट्रक उलटून शुक्रवारी सायंकाळी हनुमाननगर सर्कलजवळ अपघात झाला. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी दारूच्या बाटल्या फुटल्या आहेत. त्यामुळे नुकसान झाले आहे.
सरकारी गोदामातून ट्रकमधून मद्यसाठा घेऊन हे वाहन चिकोडी तालुक्मयात जात होते. हनुमाननगर सर्कलजवळ या वाहनाचे ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे हा अपघात घडला.
या ट्रकमधील सुमारे 5 ते 10 लाखांच्या बाटल्या फुटल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात या अपघातप्रकरणी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.









