प्रतिनिधी/ सातारा
लॉकडाऊनमुळे अगोदरच शांत झालेल्या साताऱयात लॉकडाऊन शिथील होत असताना शुक्रवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा जणांच्या टोळक्याने हातात कोयते नाचवत धिंगाणा केला. दुचाकीवरुन ते विसावा नाका ते खेड चौकापर्यंत त्यांनी काही गाडय़ांची तोडफोड केली तर त्यांच्या या धिंगाण्यात एकजण जखमी झाला आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस त्यांच्या मागावर गेले आहे. पोलीस आल्याचे समजताच त्या टोळक्याची पळापळ झाली. पोलीस सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा शोध घेत होते. दरम्यान, या घटनेची नोंद झाली नव्हती. फिल्मी स्टाईलने हा प्रकार घडल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत होते.
सातारा शहर मुळचे शांत समजले जाते. परंतु शहरानजिकच्या काही भाग हा सतत धगधगत असतो. लॉकडाऊनमुळे शांतता होती. आता थोडीसी शिथीलता मिळत असल्याने एका पाच ते सहा जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेवून दुचाकीवरुन विसावा नाका ते खेड चौक या दरम्यान दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. काही गाडय़ाची तोंडफोड केली. त्यांच्या दहशतीला विरोध करणाऱया एका व्यक्तीवर त्यांनी वार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्या जखमी व्यक्तीला उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. नाव समजू शकले नाही.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस घटनास्थळी पोहचले. तोडफोड झाल्याचे त्यांनी पाहिले. परंतु पोलीस आल्याचे माहिती मिळताच ते मद्यपी टोळके खेड परिसराकडे पळून गेल्याचे सांगण्यात आले. पोलीस त्यांच्या मागावर सांयकाळी उशिरापर्यंत होते. दरम्यान, ते दहशत माजवणारे टोळके हे पिरवाडी येथील असल्याची चर्चा होती. तामिळी फिल्मी स्टाईलने घातलेल्या धिंगाण्यामुळे साताऱयाची संस्कृती कुठे बिघडू लागली आहे. या घटनेची उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात नेंद झाली नव्हती.








