प्रतिनिधी / कागल
कागल येथून जवळच असलेल्या कोगनोळी टोलनाक्यावर गुरुवारी रात्री रिटर्न पासवरुन वाहनधारक व कॅशियर यांच्यात जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. कारमधील तरुणांकडून कॅशियरला लाथा-बुक्यांनी मारहाण करण्यात आली. यानंतर येथे जमलेल्या नागरिकांनीही या तरुणांची यथेच्छ धुलाई केली. कारमधील तरुणांनी मद्यपान केले होते.
याबाबत मिळलेली माहिती अशी, संबंधित तरुण कारमधून बेळगावकडे जात होते. येथील कोगनोळी टोलनाक्यावर ही गाडी आली असता कारमधील तरुणांनी आपल्याकडे रिटर्नचा पास आहे. त्यामुळ टोल देणार नाही असे कॅशियरला सांगितले. मात्र रिटर्नचे पास बंद करुन दोन महिने झाल्याचे व कॅशियरने या तरुणांना सांगितले. त्यांतर कारमधील युवकांनी व कॅशियरला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याबाबत कॅशियरने त्यांना जाब विचारला. यावेळी कार मधील तरुणांनी कॅशियरला खाली पाडत लाथा-बुक्यांनी मारहाण केली. यामध्ये त्याला नाकाला व तोंडाला दुखापत झाली आहे.
यानंतर तेथील कर्मचारी व जमलेल्या नागरिकांनी या तरुणांची यथेच्छ धुलाई केल्याची चर्चा आहे. या घटनेची नोंद अद्याप पोलिस ठाण्यात झालेली नाही.









