प्रतिनिधी/ रत्नागिरी
येथील सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयातील एका अधिकाऱयावर वरिष्ठ स्तरावरुन निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे समजत़े या बाबत अधिक माहिती घेण्यासाठी येथील सहाय्यक मत्स्य आयुक्तांशी संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाह़ी कर्तव्यात कसुर केल्यामुळे या अधिकाऱयावर कारवाई करण्यात आल्याचे समजते.
मत्स्य विभागाचे अधिकारी अवैध मासेमारी रोखण्यात अपयशी ठरत असल्याची ओरड मच्छीमार करत आहेत़ तसेच अवैध पध्दतीने मासेमारी करणाऱया धनदांडग्या मच्छीमारांना काही अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोपही मच्छीमार नेत्यांनी केला होत़ा त्यातच अधिकाऱयांवर कारवाई होत नसल्यामुळे या धनदांडग्या मच्छीमारांना पाठीशी घालणाऱया अधिकाऱयांवर कारवाई करण्यासाठी मच्छीमार नेत्यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले होत़े दरम्यान या वृत्ताला मत्स्य विभागातील इतर अधिकाऱयांनीही दुजोरा दिला आहे.









