निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून तयारी
प्रतिनिधी/ बेळगाव
विविध निवडणुकांची तयारी राज्य निवडणूक आयोगाने चालविली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांची माहिती घेऊन चाचपणी करण्याची सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना केली आहे. प्रत्येक मतदान केंद्राच्या सर्वेक्षणाचा अहवाल निवडणूक विभागाने मागविला असल्याने महापालिकेच्यावतीने व सेक्टर अधिकाऱयांच्यावतीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामुळे आतापासूनच निवडणुकीचे वेध लागले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मतदार याद्यांची दुरुस्ती, नव्याने नाव दाखल करणे आदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबरोबरच आता मतदान केंद्रांच्या सुरक्षेच्यादृष्टीने चाचपणी करण्याची सूचना स्थानिक निवडणूक विभागांना केली आहे. मतदान केंद्रांमध्ये पुरविण्यात आलेल्या सुविधांच्या माहितीचा अहवाल देण्याची सूचना स्थानिक स्वराज्य संस्थेला देण्यात आली आहे. यामुळे महापालिका व निवडणूक सेक्टर अधिकाऱयांकडून शहरातील मतदान केंद्रांची माहिती घेण्यास प्रारंभ करण्यात येणार आहे. आगामी काळात पोट निवडणुका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. कोणत्याही वेळी निवडणुका घोषित होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे मतदार यादीसह मतदान केंदे सज्ज ठेवणे आवश्यक आहे. महापालिकेच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत संपुष्टात आली आहे. तेव्हा सदर निवडणूकदेखील घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मतदार यादी व मतदान केंद्रांची चाचपणी वर्षातून एकदा करण्यात येते. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्राला भेट देऊन विद्युत सुविधा, पाणी सुविधा, मतदान केंद्रांच्या खिडक्मया, दरवाजे मजबूत आहेत का? याची पाहणी करून अहवाल देण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. त्यामुळे मतदान केंद्रांची पाहणी करून अपंगांना ये-जा करण्यासाठी रॅम्प तसेच सुरक्षेची चाचपणी करण्यात येणार आहे. मतदान केंदे शाळा व सरकारी इमारतींमध्ये असतात. जर इमारत कोसळली किंवा इमारतीचे बांधकाम सुरू असल्यास मतदान केंद्र अन्यत्र स्थलांतर करण्यात येते. त्यामुळे मतदान केंद्राबाबतचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात येतो. या पार्श्वभूमीवर मतदार यादी व मतदान केंद्रांच्या सर्वेक्षणाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









