हिंदवी स्वराज्य युवा संघटनेतर्फे ‘श्रीमंत योगी’ महानाटय़ाचे आयोजन
वार्ताहर / हिंडलगा
मण्णूर येथील हिंदवी स्वराज्य युवा संघटनेतर्फे सालाबादप्रमाणे यंदाही शुक्रवार दि. 19 रोजी सायंकाळी 7 वाजता श्री शिवजयंती उत्सव 2021 चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त होणाऱया ‘श्रीमंत योगी महानाटय़’ व शिवजयंती उत्सवाची मुहूर्तमेढ रविवारी दि. 14 रोजी रोवण्यात आली. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष वैभव कदम होते.
प्रारंभी प्रमुख पाहुणे अभियंते आर. एम. चौगुले, भाजपा नेते विनय कदम, अभियंते अरुण कदम, ग्राम पंचायत सदस्य दत्तू चौगुले, नागेश चौगुले यांच्या हस्ते नियोजित ‘श्रीमंत योगी महानाटय़ाच्या’ बॅनरचे अनावरण झाले. त्यानंतर संघटनेचे अध्यक्ष वैभव कदम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून श्री शिवजयंती उत्सवाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. याप्रसंगी मान्यवरांनी आपल्या भाषणात हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्या कार्याचे कौतुक करून नियोजित शिवजयंती उत्सवासाठी आर्थिक मदत देऊन सहकार्य
केले.
यावेळी राजू पाटील, बी. बी. सांबरेकर, उमेश चौगुले, सुनिल मंडोळकर, डॉ. भरत चौगुले यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, शिवप्रेमी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित
होते.
‘श्रीमंत योगी महानाटय़ाचे आयोजन’
संघटनेतर्फे दरवषी शिवजयंती उत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. त्यानुसार ग्रामस्थ व शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवशाली व महापराक्रमी कार्याची जाणीव राहिली पाहिजे. यासाठी शिवकालीन जीवंत देखावे, पोवाडा व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून प्रबोधन करण्याचे कार्य केले जात आहे. त्याप्रमाणे येत्या शुकवारी दि. 19 रोजी सायंकाळी 7 वाजता श्री शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून बेळगावमधील श्री तुळजा भवानी सांस्कृतिक प्रति÷ानतर्फे भव्य दिव्य अशा ‘श्रीमंत योगी महानाटय़ाचे सादरीकरण करण्यात येणार
आहे.
यासाठी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत असून मण्णूरसह परिसरातील सर्व शिवप्रेमी व नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून महानाटय़ाचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदवी स्वराज्य युवा संघटनेतर्फे करण्यात आले आहे.









