तालुका पंचायतच्या कार्यकारी अधिकाऱयांनी दिली भेट
प्रतिनिधी / बेळगाव
मण्णिकेरी येथे अनेक कामे प्रलंबित ठेवली होती तर येथे स्वच्छता कशी राखायची असा प्रश्न निर्माण झाला होता. याच्या तक्रारी ता.पं.कार्यकारी अधिकाऱयांकडे केल्या होत्या. याची दखल घेवून ता.पं.तीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी भेट दिली. यावेळी पीडीओंना विविध सूचना करण्यात आल्या.
यावेळी गावातील गटारी स्वच्छ नव्हत्या. त्यामुळे समस्या निर्माण होत होत्या. आरोग्याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण होत होते. दरम्यान याबाबत आरोग्य विभाग आणि पिडीओंनी याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे याचा फटका नागरिकांना बसत होता. त्यामुळे याची तक्रार करण्यात आल्यानंतर कलादगी यांनी गावाला भेट देवून येथील समस्यांची पाहणी केली व गटारी स्वच्छ करण्याबाबत पिडीओला सूचना केल्या.
मण्णिकेरी येथे हेस्कॉमच्या तारा अनेक घरांवरुन गेल्या होत्या. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी हेस्कॉमकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे याकडे ग्रामस्थांनी कलादगी यांचे लक्ष वेधले. तातडीने संबंधित अधिकाऱयांना यासंबंधीची माहिती दिली व तातडीने ही कामे पूर्ण करण्याची सूचना केली. गावातील रस्त्यांवरुन सांडपाणी वाहत होते. याची पाहणी करुन गटारी व ग्रामस्थांना नवीन सेप्टीक टँक बांधून घेण्यासाठी आवाहन केले. यावेळी ता. पं. उपाध्यक्ष मारुती सनदी, पिडीओ व ग्रामस्थ उपस्थित होते.









