दागिने अडकून पडल्यामुळे ग्राहकांची चिंता वाढली
प्रतिनिधी/ रत्नागिरी
मण्णपुरम गोल्ड लोन कंपनीचे कर्मचारी संपावर गेल्याने रत्नागिरी जिह्यातील ग्राहकांचे हाल झाले आहेत़ एप्रिल महिन्यापासून कर्मचाऱयांच्या वेतनामध्ये कपात करण्यात आली आह़े याच्या निषेधार्थ मण्णपुरम कामगार सेना या संघटनेच्यावतीने 18 नोव्हेंबर 2020 पासून हा संप पुकारण्यात आला आह़े त्यामुळे जिह्यातील मण्णपुरमच्या शाखा बंद असल्याने दागिने अडकून पडलेल्या ग्राहकांच्या चिंता वाढल्या आहेत़ अनेक लोकांनी सोनेतारण कर्जाचे हप्ते पूर्ण भरले आहेत. मात्र दागिने परत मिळण्याची लक्षणे दिसत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
सोनेतारण ठेवून कर्ज देण्यासाठी मण्णपुरम ही कंपनी ओळखली जात़े या कंपनीमध्ये अनेक रत्नागिरीकरांनी आपले सोने तारण ठेवून कर्ज घेतली आहेत़ सध्या लग्नसराई व विविध कार्यक्रमांना सुरूवात झाली असल्याने तारण ठेवलेले दागिने परत मिळवण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आह़े मात्र रत्नागिरी शहरातील मण्णपुरम कंपनीचे कार्यालय बंद असल्याने ग्राहकांना जायचे कुठे असा प्रश्न पडला झाला आह़े या वादावर लवकरच तोडगा काढण्यात यावा अशी अपेक्षा रत्नागिरीतील सर्वसामान्य ग्राहकांकडून व्यक्त करण्यात येत आह़े
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर आर्थिक मंदीचे कारण देत कंपनीकडून कर्मचाऱयांच्या वेतनामध्ये कपात केली होत़ी मात्र देशभर मिशन अनलॉक करण्यात आले आह़े तसेच विविध ठिकाणी कर्मचाऱयांचे पूर्ण पगार देण्यात येत आह़े अशावेळी मण्णपुरममध्ये कर्मचाऱयांना पूर्ण वेतन मिळावे, अशी मागणी कामगार सेनेकडून करण्यात आली आह़े राज्यभर चालू असलेल्या या संपाचा रत्नागिरी जिह्यात देखील परिणाम दिसून येत आह़े
या कंपनीमध्ये काम करणाऱया कर्मचाऱयांना आपल्या हक्कापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप कामगार सेनेकडून करण्यात आला आह़े कर्मचाऱयांची पगारवाढ रोखून धरण्यात आली आह़े तसेच बाहेरील राज्यात व शहरात कर्मचाऱयांच्या बदल्या करण्यात येत आहेत़ कर्मचाऱयांच्या हक्कांच्या सुट्टया काढून घेण्यात आल्या आहेत़ तर दर महिन्याला बळजबरीने पगारामध्ये कपात करण्यात येत आह़े इत्यादी आरोप कामगार सेनेकडून करण्यात आली आह़े








