मणेराजूरी/प्रतिनिधी
मणेराजुरीत शेकोबा डोंगराच्या पठारावर एक युवक व दोन युवतीचे मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाच्या शेजारी डॉरमेक्सची औषधाची बाटली आढळल्याने प्रथमदर्शनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा दिसत आहे. युवक मणेराजूरीचा आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. आत्महत्या प्रेमप्रकरणातून की अन्य कोणत्या कारणातून झाली आहे हे याचे कारण लवकरच स्पष्ट होईल. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करणेत आले आहेत.