ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मणिपूरमधील उखरुलमध्ये आज म्हणजेच शुक्रवारी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टल स्केल एवढी होती.
यापूर्वी याच आठवड्यात सोमवारी सायंकाळी दिल्ली एनआरसीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी भूकंपाची तीव्रता 3.7 रिश्टल स्केल एवढी होती. भूकंपाचे केंद्र हरियाणा मधील झज्जर होते. रात्री 10 वाजून 36 मिनिटांनी हा भूकंप झाला होता.