ऑक्टोबरचे वेतन फेडण्यासाठी लागणार दोन कोटी रु., दिवाळीमुळे वेतन लांबणीवर टाकणे अशक्य
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेने मागील आठवडाभरात सुमारे 60 लाख?ांची वसुली केली असली, तरी अजूनही सर्व काही आलेबेल नसून आता ऑक्टोबरचे वेतन फेडण्यासाठी पालिकेला 2 कोटींची तजवीज करावी लागणार आहे. दिवाळी पहिल्याच आठवडय़ात आली असल्याने वेतन पुढे ढकलणे शक्मय होणार नसल्याची माहिती पालिकेच्या लेखा विभागाच्या सूत्रांनी दिली.
पालिकेने सप्टेंबर महिन्याचे वेतन महिन्याच्या अखेरच्या दिवशी देण्याऐवजी ते दुसऱया महिन्यात एका आठवडय़ानंतर दिले होते, तेही पूर्ण न देता नेट वेतन दिले होते. वेतनातील भविष्य निर्वाह निधी व अन्य कपाती नंतर जमा करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले होते. सदर कपाती कर्मचाऱयांच्या खात्यांत जमा करण्यासाठी गेल्या आठवडाभरात जमा झालेली 60 लाखांची वसुली पुरेशी आहे. मात्र कर्मचारी, कंत्राटी आणि रोजंदारीवरील कामगार यांना ऑक्टोबरचे वेतन देण्यासाठी दीड कोटीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या दोन आठवडय़ांत ही रक्कम गोळा करणे शक्मय होईल असे दिसत नसून त्यामुळे पालिकेला सणासुदीच्या दिवसांत वेळेवर वेतन फेडण्यासाठी कायम ठेवीतील रक्कम मुदतपूर्व काढावी लागण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे.
गुरुवारी एकाच दिवशी मडगाव पालिकेच्या वसुलीने 26.50 लाख रुपयांचा आकडा पार केला, जो आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. याच धर्तीवर वसुली झाल्यास पालिकेला आवश्यक 2 कोटींची रक्कम या महिन्याच्या अखेरीसपर्यंत जमविणे शक्मय आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न राहतील, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली. मोठय़ा व्यावसायिक संकुलांना लक्ष्य करण्यासाठी वसुली प्रक्रिया सुलभ करणे सुरू आहे. अनेक वर्षांपासून न भरलेली घरपट्टी भरण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी केले आहे. तसेच विनापरवाना व्यवसाय करण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नसून परवाना घेण्यासाठी अशांनी पुढे यावे. मला कठोर कारवाई करण्यास भाग पाडू नका, असा इशारा त्यांनी दिलेला आहे.









