भाजप गटातील 15 नगरसेवकांच्या सह्या : अविश्वास ठरावात कोणतेही कारण नाही
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेचे नगराध्यक्ष घनश्याम शिरोडकर यांच्या विरोधात अपक्षेप्रमाणे 72 तास उलटण्याच्या अगोदर काल सोमवारी सकाळी अविश्वास ठराव दाखल करण्यात आल??ा आहे. भाजपाच्या क्रॉस व्होटिंगमुळे शिरोडकर यांची नगराध्यक्ष म्हणून निवड झ?ाली होती. त्यामुळे नाचक्कीला सामोरे जावे लागल्याने भाजपाने शुक्रवारी सायंकाळीच सर्व नगरसेवकांना पणजीत मुख्यमंत्री निवासस्थांनी पाचारण करून अविश्वास ठरावावर सह्या करून घेतल्या होत्या.
भ?ाजपाच्या मूळ तसेच आमदार दिगंबर कामत गटातील मिळून सदानंद नाईक, बबिता नाईक, कामिलो बार्रेटो मिलाग्रिना गोम्स, डॉ. सुशांता कुडतरकर, डॉ. रोनिता आजगावकर, महेश आमोणकर, स्वेता लोटलीकर, सगुण (दादा) नाईक, दामोदर शिरोडकर, लता पेडणेकर, दीपाली सावळ, सेण्ड्रा फर्नांडिस, दामोदर वरक या एकूण 15 नगरसेवकांनी या अविश्वास ठरावाच्या नोटिसीवर सह्या केल्या आहेत.
कोणतेही कारण नमूद नाही
विशेष म्हणजे सदर अविश्वास ठराव दाखल करताना कोणतेही कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. अविश्वास ठराव पालिका संचालक गुरूदास पिळर्णकर यांच्याकडे सादर करताना उपनगराध्यक्ष दीपाली सावळ, नगरसेवक महेश आमोणकर, कामिलो बार्रेटो, स्वेता लोटलीकर व सगुण नाईक हे पाच नगरसेवक उपस्थित होते.
भाजपची पाच मते फुटली
भाजपाचे एकूण 16 नगरसेवकांचे संख्याबळ होते. त्यातील सुनीता पराडकर ही नगरसेविका उघडपणे विरोधी गटात समाविष्ट झाल्याने त्यांचे संख्याबळ 15 झाले आहे. परंतु प्रत्यक्ष मतदानदिनी भाजप उमेदवार दामोदर शिरोडकर यांना 10 मते पडल्याने भाजपाची 5 मते फुटल्याचे स्पष्ट झाले होते. ही मते कोणाची फुटली याची खातरजमा करण्यासाठी भाजपा नगरसेवकांना त्याच दिवशी सायंकाळी पणजीत बोलावून घेण्यात आले होते.
मतदान गुप्त असल्याने क्रॉस व्होटिंग करणाऱयांचा शोध घेणे अशक्मय असले, तरी संशायाची सुई मूळ भाजप गटासह कामत गटातील काही नगरसेवकांकडे वळली होती. लगेच पुढचे पाऊल म्हणून भाजपतर्फे नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. अविश्वास ठरावावर मतदान हात उंचावून होत असते. तेथे गुप्त मतदान घेण्यात येत नसल्याने क्रॉस व्होटिंगची शक्मयता नसते.
विश्वासघात केलेल्यांचा व्हिडीओ योग्यवेळी दाखविणार : दामू शिरोडकर
मडगाव नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्या सहकाऱयांकडून झालेल्या उघड विश्वासघाताने दुखावले गेलेले भाजप समर्थक नगरसेवक दामू शिरोडकर यांनी आपल्याकडे विश्वासघात केलेल्यांचा व्हिडीओ असून योग्यवेळी तो मडगाववासियांना दाखविला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पाचजण कसे काय देव दामोदरासमोर क्रॉस व्होटिंग केले नसल्याचे शपथ घेतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
पाच जणांना पोहोचविली लक्ष्मी
नगराध्यक्ष बनल्यानंतर घनश्याम शिरोडकर यांनी महालक्ष्मी आपणास पावली, असे जे विधान केले ते योग्यच आहे. कारण पाच जणांना लक्ष्मी पोहोचविली असल्याने मते मिळाल्याचा टोला शिरोडकर यांनी हाणला आहे. नारळावर हात ठेवून जांबावली मंदिरात दामबाबासमोर शपथ घेण्याचे धाडस ते कसे करू शकतात, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी सांगूनही प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या समर्थनार्थ क्रॉस व्होटिंग करून पाच नगरसेवकांनी आपला विश्वासघात केला आहे. खोटे बोलणाऱयांना श्री दामोदर कधीही माफ करत नाही. त्यांच्यापुढे खोटारडेपणा चालत नाही, असे शिरोडकर यांनी म्हटले आहे.
हरल्याने नव्हे, शपथेमुळे दुखावलो
आपल्याला फक्त 10 मते कशी पडली हे देवाने जाणून घ्यावे असे दामू शिरोडकर म्हणाले. आपण निवडणूक हरलो म्हणून दुखावलेलो नाही, असे सांगून ते म्हणाले की, 14 नगरसेवकांनी श्री दामबाबासमोर मतदान केल्याची शपथ घेतल्याने आपण दुखावलो आहे. अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर रिक्त पद भरण्यासाठी कोणाला उमेदवार बनवायचे ते पक्षनेतृत्व ठरवेल, असे त्यांनी स्पष्ट केले.









