प्रतिनिधी / मडगाव
मडगावच्या गांधी मार्केट संकुलामधील एक दुकानदार कोविडबाधित मिळाल्याने ते सोमवारपासून तीन दिवस बंद ठेवण्यात आले होते. ते आता आज गुरुवारपासून खुले करण्यात येणार असल्याची माहिती गांधी मार्केट तयार कपडे व फळ-भाजी विक्रेते संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र आजगावकर यांनी दिली.
पालिकेच्या नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱयांना यासंदर्भात कल्पना देण्यात आल्यानंतर गांधी मार्केटमध्ये सोमवारी निर्जंतुकीकरण करून घेतले होते. आज गुरुवारी मार्केट खुले करण्याआधी पुन्हा निर्जंतुकीकरण करण्यात आले असल्याचे त्यांनी नजरेस आणून दिले. प्रत्येक व्यापाऱयाला मास्कसह आता सेनिटायजरची बाटली व सोशल डिस्टन्सिंगची सक्ती केली गेली आहे. ग्राहकांनाही सोशल डिस्टन्सिंग व अन्य बाबी पाळून सहकार्य करण्याचे आवाहन आजगावकर यांनी केले आहे.









