प्रतिनिधी/ मडगाव
मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्याहस्ते मडगावातील तीन प्रभागांत रु. 52 लाख खर्चाची विकासकामे शुक्रवारी मार्गी लावण्यात आली. यात वॉर्ड क्र. 19 मधील रॉयल हॉस्पिटलजवळच्या, वॉर्ड क्र. 20 मधील कोलमरड येथील सेंट क्रूझ कपेलजवळच्या आणि वॉर्ड क्र. 17 मधील मालभाट परिसरातील क्लासिक हॉस्पिटलजवळच्या विकासकामांचा समावेश होता.
आमदार कामत यांच्याहस्ते तिन्ही ठिकाणी विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला. रॉयल हॉस्पिटलनजीक पदपथ आणि गटार 19 लाख रु. खर्चून उभारण्यात येणार आहे. क्लासिक इस्पितळ, मालभाट येथे 18 लाख रु. खर्चून गटार व पदपथ उभारण्यात येईल तर प्रभाग 20 मध्ये कपेलजवळील परिसराचे 15 लाख रु. खर्चून सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. यावेळी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, उपनगराध्यक्ष दिपाली सावळ, नगरसेवक सिद्धांत गडेकर, लता पेडणेकर, नगरसेविका फर्नांडिस, कंत्राटदार बालेश देसाई, भाजप मंडळ अध्यक्ष रूपेश महात्मे उपस्थित होते.









