प्रतिनिधी / मडगाव
इंग्लंडहून गोव्यात आलेल्या आणि पोझिटीव्ह असलेल्या सुमारे 25 जणांनी मंगळवारी रात्री उशिरा मडगावच्या ईएसआय कोव्हीड इस्पितळाबाहेर पुण्याहून अजुन अहवाल न आल्याच्या कारणास्तव हंगामा केला आणि कालांतराने त्यांची समजूत काढल्यानंतर प्रकरण शांत झाले.
प्राप्त माहितीनुसार इंग्लंडहून अनेकजण विमानाने गोव्यात आलेले आहेत आणि त्यातील अनेकजण पोझिटीव्ह झालेले आहेत. सध्या इंग्लंडमध्ये कोरोनाचे नवे संक्रमण चालू आहे. त्यामुळे तेथून परतलेल्या गोवेकरांना नव्या संक्रमणाचा प्रादुर्भाव झालेला आहे का याची पडताळणी चालू आहे.
या सुमारे 25 जणांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत यापूर्वीच पाठविण्यात आलेले आहेत. त्यातील मोजक्या लोकांचे अहवाल आलेले आहेत. इतरांचे अजून आलेले नाहीत. यावरुन या लोकांनी मंगळवारी हैदोस घातला. एकंदर प्रकरण पाहून मडगाव पोलीस घटनास्थळी हजर झाले. परिस्थिती पाहून सासष्टीचे मुख्य मामलेदार प्रताप गावकर घटनास्थळी आले व त्यांनी त्यांची समजुत काढल्यानंतर प्रकरण शांत झाले.









