साहित्यः
मॅरीनेटसाठीः अर्धा किलो मटण, 1 वाटी दही, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, चवीपुरते मीठ, 1 चमचा लाल तिखट पावडर, 1 चमचा धणेपूड, पाव चमचा हळदपूड, 1 हिरवी मिरची मधून चिरून, मसालाः 4 लवंग, 2 इंच दालचिनी, 4 वेलची, 2 मोठी वेलची, अर्धा चमचा काळीमिरीपूड, इतरः 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून, 1 वाटी तळलेला कांदा, 3 चमचे तूप अथवा तेल, 2 वाटी पाणी, चिमुटभर जायफळपूड, पाव चमचा वेलची पावडर
कृतीः प्रथम मटण धुवून पूर्णतः कोरडे करून बाऊलमध्ये काढावे. त्यात मॅरीनेटचे इतर साहित्य व गरम मसाला घालून मिश्रण मिक्स करून दोन तास झाकूण ठेवावे. आता गरम तेलात कांदा गुलाबी रंगावर परतवून मिक्सरला लावून पेस्ट बनवावी. त्याच गरम तेलात कांदा पेस्ट गुलाबी रंगावर परतवून नंतर त्यात मॅरीनेट मिश्रण दहा मिनिटे मध्यम आचेवर परतवावे. मटण आणखी अर्धा तास ठेवून शिजवून घ्यावे. वरून तळलेला कांदा घालावा. नंतर पाणी मिक्स करून अर्धा तास मंद आचेवर मिश्रण ठेवावे. मटण शिजले की वरून जायफळपूड आणि वेलची पूड टाकून आच बंद करावी. तयार कोरमा रोटी, नान अथवा पुलावसोबत खाण्यास द्या.









