प्रतिनिधी / नागठाणे
नागठाणे परिसरात सासपडे व नागठाणे (ता.सातारा) येथे सुरू असलेल्या चोरट्या मटका अड्ड्यांवर बोरगाव पोलीस गुरुवारी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी तेथून १४०० रुपये रोख व अन्य साहित्य जप्त करत दोघाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुरलीधर तानाजी पवार(रा.सासपडे) व राजेंद्र शंकर कांबळे (रा.बौद्ध वस्ती,नागठाणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यावेळी ताब्यात घेतलेल्या मुरलीधर तानाजी पवार या अड्डाचालकाने अतीत (ता.सातारा) येथील चंद्रकांत यादव (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) याच्या सांगण्यावरून मटका अड्डा चालवत असल्याची माहिती पोलिसांना दिली.
गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास या कारवाया करण्यात आल्या. सपोनि डॉ.सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक फौजदार रामचंद्र फरांदे,हवालदार राजू शिंदे, विजय साळुंखे,विशाल जाधव,अमित पवार व थोरात यांनी कारवाईत सहभाग घेतला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









