83 हजार रुपये, 16 मोटारसायकली, 14 मोबाईल जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
मच्छे येथील एका जुगारी अड्डय़ावर छापा टाकून 12 जुगाऱयांना अटक करण्यात आली आहे. रविवारी रात्री बेळगाव ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्या जवळून 83 हजार रुपये रोख रक्कम, 16 मोटारसायकली, 14 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या जुगाऱयांवर बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या अड्डय़ावरून काही जण फरारी झाले आहेत.
इम्तियाज अब्दुललतिफ अत्तार (वय 30, रा. गांधीनगर, खानापूर), समीर चांदसाब बाळेकुंद्री (वय 42, रा. आंबेडकरनगर, अनगोळ), निसारअहम्मद निजामुद्दीन हतेली (वय 56, रा. आंबेडकरनगर, अनगोळ), मेहबुब कुतबुद्दीन शाबाजखान (वय 41, रा. आनंद गल्ली-मच्छे), गोपाळ रामू दंडगल (वय 40, रा. सिद्धेश्वर गल्ली, पिरनवाडी), आयुब महम्मद बसरीकट्टी (वय 45, रा. मुल्ला गल्ली, खानापूर), प्रकाश गावडू देसाई (वय 45, रा. प्रताप गल्ली, येळ्ळूर), यश अशोक घोडके (वय 19, रा. शाहूनगर, शेवटचा बसस्टॉप), शानूर मीरासाहेब मुल्ला (वय 42, रा. राजहंस गल्ली, अनगोळ), सलीम रशीद तहसीलदार (वय 39, रा. झी कॉलनी, अनगोळ), फारुक नन्नासाब अल्लण्णावर (वय 34, रा. अशोकनगर), असाद शौकत हुजदार (वय 45, रा. मच्छे) अशी अटक करण्यात आलेल्या 12 जणांची नावे आहेत. झाकीर पठाण (रा. भोवी गल्ली) याच्यासह आणखी काही जण फरारी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.









