वार्ताहर / किणये :
मच्छे येथील ब्रह्मलिंग मंदिर परिसरात 24 तास विद्यूत पुरवठा करण्यात येणार आहे. या कामकाजाचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला. पांडू लाड यांच्या फार्म हाऊसपासून ब्रह्मलिंग मंदिरापर्यंत 14 खांब व बल्ब बसविण्यात येणार आहेत. यासाठी 14 व्या वित्तआयोग योजनेतून 1 लाख 60 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती ग्राम पंचायत सदस्य सचिन बेळगावकर यांनी दिली आहे. पूजनप्रसंगी ग्राम पंचायत उपाध्यक्ष असद हुजदार, गाव पंच कमिटीचे अध्यक्ष चांगाप्पा हावळ, माजी तालुका पंचायत सदस्य संजय सुळगेकर, ग्राम पंचायत सदस्य महादेव मंगणाकर, रमेश कऱयाण्णवर, गणपत जाधव, बापू पुजारी, धोंडीराम तरनाळे, अशोक पुजारी, राहूल पाटील आदी उपस्थित होते.









