दर आधीसारखेच, परंतु ग्राहक आधीसारखे नाही
प्रतिनिधी / रत्नागिरी
कोरोना वाढत्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथील मच्छीमार्केट काही दिवसांपासून बंद होते. परंतु अनलॉक नंतर येथे अगदी बोटांवर मोजण्यासारखे ग्राहक दिसून येत आहेत. अनलॉकनंतर मत्स्य खवय्यांची गर्दी कमी झाली असल्याचे येथील विक्रेत्या महिलांनी सांगितले.
ग्राहक कमी असल्याने तसेच यांत्रिक मच्छीमारी बंद असल्याने, गरवलेले तसेच पागून आणलेले मासे व छोट्या होडीने किनाऱ्यालगत पकडण्यात आलेले मासे विक्रीस उपलब्ध आहेत. यामध्ये कोलंबी, ताबोशी आणि वाटू इतकेच मासे विक्रीस उपलब्ध होते. कोरोना कालावधीनंतर सर्वच गोष्टींचे दर वाढले असले तरी माश्यांच्या किंमती पूर्वीसारख्याच आहेत.









