वार्ताहर / पंढरपूर
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर बंद असल्याने यावरती अवलंबुन असणा-या कुटुंबाचे हाल होत आहेत. लोकांची होणारी परवड थांबविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मंदिर उघडण्यासाठी सोमवार 31 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात येणार असून राज्यातून एक लाखाहुन अधिक आंदोलनकर्ते पंढरपूरात येणार असल्याची माहिती नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी दिली.
विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलनाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी पंढरपूर पञकार भवन येथे पञकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी आनंद चंदनशिवे बोलत होते. यावेळी विश्व वारकरी सेनेचे ह.भ.प अरुण महाराज बुरघाटे, सागर गायकवाड, माऊली हळणवर आदी उपस्थित होते. मंदिर बंद असल्याने हार विक्री, भजन किर्तनाचे साहित्य, पेढे, टांगेवाले, रिक्षा, फोटो विक्रेते व आदी मंदिरावरावरती ज्यांचा चरितार्थ चालतो अशांची लॉकडऊन काळात परवड झाली आहे. मंदिर बंद असल्याने वारकरी येत नाहीत त्यामुळे पंढरीच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी मंदिर उघडणे गरजेचे आहे.
तिरुपती येथील बालाजीचे मंदिर सुरू करण्यात आलेले आहे. परंतु गरीबांचा देव असलेला पांडुरंगांचे मंदिर बंद आहे. वंचित बहुजन आघाडी व विश्व वारकरी सेना यांच्या नेतृत्वाखाली सोमवार 31 ऑगस्ट रोजी मंदिर प्रवेश आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाला राज्यातील 200 हुन अधिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच सोमवारच्या आंदोलनासाठी राज्यातुन एक लाखाहुन अधिक आंदोलनकर्ते पंढरपूरकडे येत आहेत.
सोमवारी सकाळी 11 वाजता मंदिर प्रवेशापूर्वी वारकरी परंपरेनुसार अॅड प्रकाश आंबेडकर हे चंद्रभागा नदीपाञातील भक्त पुंडलिकाचे दर्शन घेऊन, महाद्वार व मुख्य मंदिरातील गाभा-यात प्रवेश करुन मंदिर सर्वांसाठी दर्शनासाठी खुले करतील. तसेच शिवतिर्थांवर आंदोलनकर्त्यांना अर्धा तास मार्गदर्शन करणार आहेत.
सत्तेच्या दारासाठी भाजपाचे ‘नाटक’
अॅड. प्रकाश आंबेकडर यांनी मंदिर उघडण्यासाठी ‘चलो पंढरपूर’चा नारा दिला आहे. सरकारला मंदिर उघडावेच लागेल. परंतू सध्या भाजपाकडून मंदिर उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. माञ हे आंदोलन मंदिरासाठी नसून सत्तेची दारे उघडण्यासाठी भाजपाची चाललेली ‘नाटक’ असल्याची टीका नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









