प्रतिनिधी / सांगली
कोरोना संकटकाळाचे लॉकडाउन (टाळेबंदी) हटवून आपण राज्यात मिशन बिगीन अगेन सुरु केले आहे. या मिशन बिगीन अगेनमध्ये बाजारपेठा काही निर्बंधा अधीन राहून हळूहळू सुरू होत आहेत. त्याचप्रमाणे शहरांतर्गत व राज्यातील बस प्रवासी वाहतूकही टप्प्या टप्प्याने सुरू होत आहे. याप्रमाणेच राज्यातील मंदिरे भाविकासाठी खुली करावीत अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
नुकताच राज्य सरकारने हॉटेल आणि उपहारगृहे काही निर्बंधातर्गत सुरू करण्याचा निर्णयही घेतला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने महिन्याभरापूर्वीच परवानगी दिलेली असल्याने “पुनश्च हरि: ओम” अभियानांतर्गत प्रतिबंधात्मक सर्व नियम पाळून मंदिरे, मशिदी, गुरुद्वार चर्च सुरू करून त्यात मर्यादित संख्येने ठराविक कालावधीची सीमारेषा आखून मंदिरे, मशिदी, गुरुद्वार, चर्च सुरू करावेत.
कोरोनाव्हायरस मुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे देशभरातील धार्मिक स्थळं ही जवळ जवळ ३ महिने बंदच आहेत. तसेच आपण मद्य मंदिरे सुरु केली पण खरी मंदिरे ही बंदच आहेत. त्याचप्रमणे राज्यातील रेडझोन शहरे वगळता किमान गावागावांमध्ये लहान-लहान मंदिरांना तरी सोशल डिस्टन्सिंग सारख्या नियमांचे ज्यामध्ये मंदिरांमध्ये भाविकांच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मल स्कॅनरचा वापर, आरोग्य सेतू ॲप वापर करण्यास प्रोत्साहन, मास्क घालणे बंधनकारक, मूर्तीला स्पर्श करण्यास मनाई, संपूर्ण मंदिराचे निर्जंतुकीकरण, सॅनिटायझर यांच्या अधीन राहून व अशा प्रभावी उपाययोजना राबवून मंदिरे सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी.
एक महिन्यापासून मंदिरे सोशल डिस्टन्सिंगच्या अधीन राहून सुरू आहेत. आज या संकटकाळात समाजाला भावनिक, धार्मिक आधाराची देखील खरी गरज आहे. त्यामुळे समाजासाठी बंद केलेली सर्व देवस्थाने योग्य ती काळजी घेत तातडीने उघडावीत
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








