मुख व गाभारा दर्शनासाठी ई-पास सक्तीचा
कोल्हापूर/प्रतिनिधी
करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि श्री जोतिबाचे दर्शन आता लहान मुलांना देखील मिळणार आहे. तसेच भाविकांसाठी मुख आणि गाभारा दर्शन अशी वेगवेगळी रांग करण्यात येत असून त्यासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आला आहे. महाद्वार पासून ते गरुडमंडपापर्यंत मुखदर्शनाची रांग असेल, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्ष धार्मिक स्थान बाबत निर्बंध घालण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 14 जिल्हे निर्बंध मुक्त केल्याने आता कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि श्री जोतिबा मंदिरातील निर्बंध कमी करण्यात आले आहेत. मात्र दर्शनासाठी असणार ई-पास मात्र कायम असेल अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.
मंदिरात आता लहान मुलांना देखील दर्शनासाठी सोडले जाईल तसेच मुख आणि गाभारा दर्शनासाठी वेगवेगळी दर्शन रांग असेल. त्यासाठी ई पास बंधनकारक असेल. अशी माहिती यावेळी देण्यात आली. तसेच दर्शनासाठी जाताना ओटी नारळ नेण्यास परवानगी देण्यात येत आहे. अशी माहिती नाईकवाडे यांनी दिली.








