मुंबई \ ऑनलाईन टीम
‘रेल्वे सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यवस्थित अभ्यास करून निर्णय घेतील. आपण लोकल सुरू होण्यासंदर्भात २ ते ३ दिवसांची वाट पाहायला पाहिजे. तसेच मंदिरं उघडणे आणि लग्न समारंभासारख्या मोठ्या कार्यक्रमांना परवानगी देण्याबाबत वाट पाहावी लागेल, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
दरम्यान तज्ज्ञांनी शाळा दिवाळीनंतर सुरू कराव्यात आणि मंदिर सुरू करण्याची राज्य सरकारने घाई करू नये असा सल्ला दिला आहे. याबाबत राजेश टोपे म्हणाले की, ‘कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेजचा निर्णय संबंधित विभाग घेतली. मंदिरं उघडण्यासाठी आणि कार्यक्रमांना परवानगी देण्यासाठी थोडी वाट बघू. घाई गडबडीने काही गोष्टी केल्या तर त्याच्यामुळे काही अनर्थ होऊ नये, संक्रमण खूप वाढू नये, या सगळ्या काळजी पोटी मुख्यमंत्र्यांनी काळजीपूर्वक गोष्टी सुचवल्या आहेत. त्यामुळे याबाबत थोडी वाट बघावी लागेल.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन संदर्भात मिटींग होणार आहे. ऑक्सिजनसंदर्भात तिसऱ्या लाटेमध्ये अपेक्षित संख्या धरलेली आहे. इतके ऑक्सिजन पुरेस राहिलं की नाही यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण कसे राहू याकडे सध्या लक्ष्य आहे. दरम्यान आता आरोग्य विभागातील रिक्त जागा भरल्या जातील, असे देखील राजेश टोपे म्हणाले.
Previous Articleपेगॅससने नाही तर मग देशात येऊन कुणी हेरगिरी केली- नवाब मलिक
Next Article ऑलिम्पिकमध्ये होणार क्रिकेटचा समावेश?








