प्रतिनिधी/ बेळगाव
मंथन कल्चरल ऍण्ड सोशल वेल्फेअर सोसायटी यांच्या वतीने गुरूवार दि. 27 जानेवारी रोजी 35 व्या महिला साहित्य संमेलन ऑनलाईनद्वारे होणार आहे. दुपारी 2 ते सायंकाळी 6 या वेळेत हे संमेलन होणार आहे. संमेलनाध्यक्षा म्हणून डॉ. स्मिता सुरेबानकर विचार व्यक्त करणार आहेत. त्यांचा परिचय पुढीलप्रमाणे.
आरपीडी कॉलेजच्या माजी प्राचार्या डॉ. स्मिता सुरेबानकर या एक इतिहास संशोधक व लेखीका आहेत. यासह इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि स्थापत्यशास्त्र हे त्यांचे अभ्यासाचे प्रमुख विषय आहेत. कर्नाटक विद्यापिठ धारवाड येथून त्यांनी इतिहास विषयात पीएचडी केली आहे. क्षेत्रीय संरक्षणाभिमुख ऐतिहासीक संशोधनावर आधारीत 9 पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
विद्यापिठ अनुदान आयोगाद्वारे, नवी दिल्ली द्वारे अर्थ सहाय्य प्राप्त प्रकल्प त्यांनी पूर्ण केले असुन, ऐतिहासीक जर्नल्स मध्ये त्यांचे 50 हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. पुरातत्व विश्वकोष आणि कर्नाटक राज्य गॅझेटियरमध्ये त्यांचे महत्वाचे योगदान आहे. युवा वर्गाला प्रोत्साहन देत त्यांनी बेळगाव येथील हलशी येथे बृहत्शीला संस्कृती स्थळ व उचगाव येथे 23 स्मारक शिल्पे शोधून काढली आहेत. बेळगाव आणि कर्नाटकचा ऐतिहासिक दृष्टीने सखोल अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना कर्नाटक इतिहास अकादमीतर्फे ‘सर्वोत्कृ÷ महिला पुरातत्व शास्त्रज्ञ’ पुरस्कार आणि फिएस्टा बेळगावतर्फे शैक्षणिक क्षेत्रातील ‘वूमन अचिव्हर’ या पुरस्कारानी सन्मानीत करण्यात आले आहे.
यानंतर दुसऱया सत्रात कवयीत्री शांता शेळके यांच्या जन्म शताब्दी निमित्त …. तरी असेल गीत हे हा कार्यक्रम होईल, संकल्पना व लेखन आशा कुलकर्णी यांची आहे. यानंतर सदस्यांतर्फे नृत्याविष्कार होणार आहे.









