कागल / प्रतिनिधी
कागल शहरात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी आणखी पाच रुग्णांची यामध्ये भर पडली आहे . ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गल्लीत कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे हा परिसर कॅन्टोन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे 14 दिवस मंत्री मश्रीफ यांना त्यांच्या घरी कोणीही भेटू शकणार नाहीत.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी नेहमीच कार्यकर्ते, नागरिकांची रिघ लागलेली असते . मात्र त्यांचे निवासस्थानाजवळ 3 पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून हा परिसर कॅन्टोन्मेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी १४ दिवस कोणीही येवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
कागल शहर आणि परिसरामध्ये कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी शहरांमध्ये एकूण पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. शहरात एकूण १२५ रुग्ण झाले आहेत. ४६ रुग्ण बरे झालेआहेत. ७ मयत झाले असून ७२ रुग्णांच्या वर कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.
Previous Articleदुसऱया दिवशी सेन्सेक्सची 478 अंकांची उसळी
Next Article सातारा जिल्ह्यात 226 जणांना डिस्चार्ज, 46 नवे रुग्ण









