प्रतिनिधी / कोल्हापूर
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची अचानक प्रकृती बिघडली आहे. यामुळे त्यांना मुंबई येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना फ्लूची लक्षणे दिसत असून त्याबाबतचे उपचार सुरू असल्याचे प्रमुख कार्यकर्त्यांनी सांगितले. याआधी मुश्रीफांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर उपचारानंतर त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती.
यातच, गेल्या दोन दिवसापूर्वी मुश्रीफ यांच्यावर मोठ्या घोटाळ्याचे आरोप करण्यात आले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँडरिंग, बेनामी व्यवहारांद्वारे 127 कोटींचा घोटाळा केला असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर यासंबंधी ईडीमध्ये रितसर तक्रार नोंदवत याबाबतचे 2700 पानांचे पुरावे सादर केले आहेत. यावर मंत्री मुश्रीफांनी सोमय्या यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे सांगितले.
Previous Articleसोनू सूदने २० कोटी रुपयांचा कर चुकवला: आयकर विभाग
Next Article वाळव्यासाठी प्रदीप उबाळे नवे तहसीलदार








