प्रतिनिधी/ पणजी
मुरगांव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष रिमा सोनुर्लेकर यांना नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी धमकी दिल्याने त्यांची ही दादागिरी खपवून न घेता त्यांना मंत्रीमंडळातून काढण्याची मागणी काँग्रेसतफ्xढ करण्यात आली आहे. काँग्रेस प्रवक्ता अमरनाथ पणजीकर यांनी रिमा सोनुर्लेकर आणि मंत्री मिलिंद नाईक यांच्यामध्ये फ्ढाsनवर झालेले संभाषण पत्रकार परिषदेत एकवले असून त्यात मंत्री उपनगराध्यक्षांना धमकी देत असल्याचे स्पष्ट झाले.
यावेळी काँग्रेस प्रदेश युवा अध्यक्ष वरद म्हार्दोळकर आणि थिवी बुथ संयोजक सतीश चोडणकर यांची उपस्थिती होती. वरद म्हार्दोळकर यांनी सांगितले की या ऑडीओमध्ये जे संभाषण झाले आहे त्यात मंत्री मिलिंद नाईक उपनगराध्यक्षांना कामावरुन काढण्याची धमकी देत आहे. ज्या भाषेने ते महीलेकडे बोलत आहे त्यावरुन त्यांचा स्वभा कुणालाही लक्षात येईल. मंत्री नाईक हे सदर मतदारसंघाचे आमदार असूनही ते इतर नगरसेवकांना देण्यात येणारे कामगारही आपल्या घरी मागवून घेत असल्याने त्यांना विकास नको आहे हे स्पष्ट होते.
रिमा सोनुर्लेकर यांनी त्यांच्या या धमकीला न घाबरता जे उत्तर दिले ते खरेच कौतुकास्पद असून त्यांचे आम्ही काँग्रेस पक्षातफ्xढ अभिनंदत करत असल्याचे वरद म्हार्दोळकर म्हणाले. केवळ विरोधी पक्षच नव्हे तर मंत्रीमंडळातही बऱयाचजणांना मंत्री मिलिंद नाईक नको आहेत. मुख्यमंत्र्यांनी हे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांचे मंत्रीपद काढून घेण्याची मागणीही त्यांनी केली.









