प्रतिनिधी :
मंत्री मायकल लोबो यांनी म्हापसा मतदारसंघात वॉर्ड क्रमांक 10 मधील तुषार टोपले यांच्या वॉर्डमद्धे भाजी, कांदे, बटाटे आदी वस्तूची उपलब्धता करून दिल्याने म्हापश्यातील अनेक नागरिकांनि याचा फायदा घेतला अगदी स्वस्त दारात येथे हे जीवनआवश्यक वस्तू उपलब्ध झाल्याने म्हापश्यातील नागरीकानीं नगरसेवक तुषार टोपले व मंत्री मायकल लोबो यांचे आभार मानले. म्हापश्याचे आमदार जोशुआ डीसोझा यांना जे होऊ शकले नाही ते लोबोनीं करून दाखविल्याने म्हापश्यात हा चर्चेचा विषय बनला होता. आणि मायकल लोबो यांची एन्ट्री म्हापश्यातील नागरिकांना खूप काही सांगून गेली. दरम्यान मंत्री लोबो यांनी अन्साभाट म्हापसा येथे सुमारे दीड तास उपस्थित राहून नागरिकांच्या ज्या गरजा आहेत त्याकडे भर दिली. म्हापश्यातील 1000 नागरिकांनी या भाजीचा फायदा घेतला.
म्हापश्याच्या आमदाराबाबत उलट सुलट चर्चा
गेल्या आठवडय़ाभर सर्वत्र सोसिअल मीडियावर म्हापश्याचे आमदार जोशुआ डीसोझा यांच्याबाबत म्हापश्याचे आमदार गायब झाल्याचे पोस्ट येत होते. एका इंग्रजी वृत्तपत्राने ती बातमी प्रसिद्ध केल्याने आमदार जोशुआने म्हापसा पोलीस स्थानकात जाऊन पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांची भेट घेऊन विचारपूस केली. सोसिअल मीडियावर जोशुआची पोलीस भेटही टीकेचे कारण बनले. सर्वत्र कोरोनाबाबत चरच्या सुरु आहेत, नागरिक आपला व्यवसायधंदा बंद करून घरीच राहीले आहेत असे असताना आमदार आपल्या तोंडून एकही भ्रम काढत नाही शिवाय म्हापश्यात 20 वॉर्डांपैकी कुठेही आपल्या मतदराशी न जाता त्यांची विचारपूस न करता थेट पोलीस स्थानकात जाऊन काय विचारपूस करीत आहेत असा प्रश्न म्हापश्यात निर्माण झाला आहे.
त्यात मंगळवारी म्हापश्यात महसूलमंत्री जेनीफर मोन्स?रात यांनी स्वतः गोरगरीब लोकांना स्वतः जेवण वाढून मानवता दाखविली तर मंत्री मायकल लोबो यांनी म्हापसा वासीयांसाठी भाज्याची व्यवस्था केली मात्र म्हापश्याचे आमदार नागरिकांची साधी विचारपूसही करण्यास तयार नाही असा आरोप म्हापश्यातील नगरवासीयांनी केला.
कांदे, अंडी मंत्र्याकडून मोफत व्यवस्था.
म्हापसा भागातील ज्या लोकांनी सर्व प्रकारची भाजी बटाटे खरेदी केल्या त्या लोकांनी मंत्री मायकल लोबो यांनी एक किलो कांदे आणि अंडी मोफत देण्याची व्यवस्था केली. पत्रकाराशी बोलताना मंत्री मायकल लोबो म्हणाले की, आपण संपूर्ण कळंगुट मतदारसंघामध्ये स्वस्त भाजी, कडधान्य देण्याची व्यवस्था केली आहे. म्हापश्यातील नागरिकांच्या वतीने नगरसेवक तुषार टोपले तसेच इतर मतदारसंघातील सरपंच, पंच सदस्य नगरसेवक यांनी आपल्याकडे स्वस्थ भाजी व किराणा सामानाचे सहकार्य मागितले असता ते आपण त्यांना दिले असे त्यांनी सांगितले. येथे आपले कोणतंही राजकारण नाही. प्रत्येक आमदाराने बाहेर येऊन आपापल्या मतदारसंघात सहकार्य करावे असे ते म्हणाले.
सर्वांना भाजी मिळावी हाच उद्देश.
नगरसेवक तुषार टोपले म्हणाले की हि भाजी आणण्यासाठी मंत्री मायकल लोबो यांचे सहकार्य तसेच विठ्ठलवाडी युथ संघांची मोलाची मदत मिळाली यांच्या सहकार्यानेच हे शक्मय झाले. म्हापसा वासियांना स्वस्तदारात भाजी उपलब्ध व्हावी व त्यांना मदत मिळावी हाच यामागचा उद्देश होता असे ते म्हणाले.
दरम्यान बुधवारी बार्देश तालुक्मयात फलोत्पादन महामंडळाच्या दुकानात भाजी पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली होती.









