प्रतिनिधी /बेळगाव
गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी मंगळवारी लोकमान्य को- ऑप. सोसायटीला सदिच्छा भेट दिली. गुरुवारपेठ टिळकवाडी येथील मुख्य कार्यालयात भेट देऊन त्यांनी संस्थेचे कौतुक केले. लोकमान्य को. ऑप. चे चेअरमन किरण ठाकुर यांनी त्यांचा लोकमान्य परिवारातर्फे सत्कार केला.
मंत्री दीपक पाऊसकर यांनी लोकमान्यच्या प्रगतीचा आढावा घेतला. अल्पावधीत लोकमान्य सोसायटीने गाठलेल्या यशाचे त्यांनी कौतुक केले. याचसोबत यावेळी चोर्ला-गोवा व रामनगर – गोवा या महामार्गांविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी नाटय़ कलाकार आप्पा गावकर, सरपंच जितेंद्र नाईक, डॉ. सर्वानंद सावंत-देसाई, माजी सरपंच संतोष गावकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद विरनोडकर, लोकमान्यचे सीईओ अभिजित दिक्षित, समन्वयक विनायक जाधव, किरण गावडे, नवनिर्वाचित नगरसेवक रवी साळुंके यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी नगरसेवक रवी साळुंके यांचा लोकमान्यतर्फे सत्कार करण्यात आला.









